Shri Dashavtar Aarti New 2017


  • दशावतारांची आरती – आरती सप्रेम

  • आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
  • भक्त संकटिं नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥
  • अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी ।
  • वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी ॥
  • मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
  • हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती० ॥ १ ॥
  • रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
  • परोपकरासाठीं देवा कांसव झालासी ॥
  • दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी ।
  • प्रल्हादाकारणें स्तंभीं !नरहरि गुरगुरसी ॥ आरती० ॥ २ ॥
  • पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी ।
  • भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेसी ॥
  • सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
  • वामनरूप धरुनी बळिच्या द्वारीं तिष्ठसी ॥ आरती० ॥ ३ ॥
  • सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।
  • कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥
  • निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
  • सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ आरती० ॥ ४ ॥
  • मातला रावण स~र्वां उपद्रव केला ।
  • तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला ॥
  • पितृवचनालागीं रामें वनवास केला ।
  • मिळोनि वानरसहित राजा राम प्रगटला ॥ आरती० ॥ ५ ॥
  • देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें ।
  • नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें ।
  • गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले ।
  • गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ आरती० ॥ ६ ॥
  • बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा ।
  • सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥
  • म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा ।
  • बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥ आरती०

Comments